पैठण, (प्रतिनिधी) भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचालित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर पैठण येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास कटिबद्ध राहत त्यांच्यातील सुप्त गुणांचा वेध घेत, त्यांच्या पंखाना बळ देण्यासाठी नेतृत्व गुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
विविध क्षेत्रातील सक्षम नेतृत्व शिरोमणी असलेल्या यशस्वी व्यक्तीतर्फे व्याख्याने या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. या शिबिराचे उद्घाटन उद्घाटन व उद्बोधन सत्रामध्ये प्रमुख वक्ते शिवराज भैय्या भुमरे जि प सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वैशाली विनोद बोंबले पं. स. सभापती, प्रियंका भुजंग पंस समस्या, वैभव मुळे सरपंच ढोरकीन ग्रा. पं, सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुळे, महेश मापारी किरण जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी जुगलकिशोर लोहिया हे होते. या सर्वांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वल करून करण्यात आले. प्रास्ताविक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी केले.
शिबीराचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. समजाप्रती शाळेचे योगदान सांगण्यात आले. प्रमुख वक्ते युवा नेतृत्व शिवराज भैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या मनाचा वेध घेत. त्यांना पूरक असे संवाद साधत नेतृत्व या शब्दाची प्रत्यक्षानुभूती
दिली. नेतृत्व व कर्तृत्व कुणाकडून मागून मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. हे सांगून माझ्या आयुष्याचा खरा पाया ज्या ज्ञानाच्या आगारात रचला गेला त्या माझ्या मराठी शाळेचा मला अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले. नेतृत्व करायचे असल्यास प्रत्येकाचे मत ऐकून घेतले पाहिजे तेथे आपले योगदान कसे देता येईल यासाठी प्रयत्न करणारे खरे नेतृत्व होय असे मुलांना मार्गदर्शनात सांगितले.
-- यज्ञेश कातबने यांनी माझी शेती माझा अभिमान हा विषय मांडला --
यासामवेत वैशाली बोंबले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रियंका भुजंग यांनी उपस्थित मान्यवरांचे ऋण निर्देश व्यक्त करत शाळेच्या विकासासाठी आम्ही सतत सहाय्यक राहू अशी मान्यवरांच्या वतीने ग्वाही दिली. दुसऱ्या सत्राचे लक्षवेधी वक्ते युवा शेतकरी म्हणून तालुक्याचे भुषण ठरलेले यज्ञेश कातबने यांनी माझी शेती माझा अभिमान हा विषय मांडला. उच्चशिक्षित नवतरूणाने शेतीत केलेले नवनवीन प्रयोग व सेंद्रिय शेती यावरील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले.
-- गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण --
तदनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे इ. पाचवी ते सातवीच्या विद्याथ्यांनी अल्पावधीत उत्तम तयारी करून कलादर्शक व गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण केले. समारोप सत्रातील मुख्य आकर्षण होते उत्कृष्ट गायक व आदर्श शिक्षक सिराज पठाण मार्गदर्शन व मंत्रमुग्ध गायन यांचा सुंदर संगम साधत हे सत्र आनंददायी व गोड करत कार्यक्रमाचा समारोप केला.
नेतृत्व गुणविकास शिबीराचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात शिबीर प्रमुख विनोद सरोदे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख उज्वला कुटे व सर्व शिक्षक यांनी यशस्वी पार पाडले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विराज सरोदे, स्पर्शीका बोन्द्रे, ईश्वरी पाखरे, औताडे, सृष्टी पाटील, महेश सांगळे, धनश्री भुसारे, प्रिती टरमाळे, आर्या सावंत इत्यादी विद्यार्थ्यांनी केले.












